img 0139 1.jpg

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे चर्चेत असलेली ‘मोनोरेल’ आता नव्या अवतारात धावणार आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले नवीन डबे मोनोरेलच्या ताफ्यात सामील झाले आहेत.

हे नवीन डबे अधिक सुरक्षित आणि वेगवान असून, प्रवाशांना उन्हाळ्यातही थंडगार प्रवासाचा अनुभव मिळेल. चेंबूर ते जेकब सर्कल या मार्गावर फेऱ्यांची संख्या वाढवण्याचे नियोजन एमएमआरडीएने (MMRDA) केले आहे. यामुळे पूर्व उपनगरातील ट्रॅफिकची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.